Lay Bhari Diste Por Song Lyrics Marathi | Sonali Sonawane | Harshvardhan Wavre
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Lay Bhari Diste Por Song Lyrics Marathi बघणार आहोत. अनिकेत टी जाधव यांनी हे गाणं लिहिलं आणि गाण्याला म्युझिक दिलेल ओंकार रणधीर यांनी आहे. हर्षवर्धन वावरे आणि सोनाली सोनावणे यांनी हे गाणं गायलेल आहे. चला तर मग बघूया लय भारी दिसते पोरं या गाण्याचे बोल -
सॉंग - लय भारी दिसते पोरं
लिरिक्स - अनिकेत टी जाधव
सिंगर - हर्षवर्धन वावरे , सोनाली सोनावणे
म्युझिक - ओंकार रणधीर
म्युझिक ऑन - साईरत्न एंटरटेनमेंट
Lay Bhari Diste Por Song Lyrics | Marathi
ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना
दिल नुस्ता करतो धडपड,
संपुदे देवा हि वनवन रं,
सिंगलचा टॅग हा आता नाकोसा झालाया,
वाऱ्याच्या झुळके परी, भेटली एक हूर परी..
तिला पाहता पिरमाचा हुंदका आलाया ...
पायात पैंजन घालुन, कंबर लचकते मोरणीवानी ...
लुभावते मन हे माझे, चाल तिची ती हरणीवाणी....
बनशील का राणी माझी बायको तू दिवाणी...
हे रंगानं गोरी-गोरी, लावते कपाळी चंद्रकोर,
साज मराठमोळा लयभारी,
लयभारी दिसते पोर...
हे हे हे ... हे हे हे ... हे
हे घारं डोळं, बोलणं मधाळ, नक्षत्राचं लेणं,
तिच्या हातीचं काकण...
हे गालावरी लाज, गावराण बाज,
काळजाच्या शिवाराला, पिरमाचं बियाणं...
खरं प्रेम माझं तुझ्यावर, देतो सबूत,
चिडू नको माझ्यावर, मी काढतो समजूत...
मोठा तोरा नाकावरती, ती तिखट लवंगी मिरची,
सतत बोलकी जीभ तिची,
तिला धार ती तलवारीची...
बनशील का राणी माझी तु बायको दिवाणी ...
हे रंगान गोरी-गोरी,
लावते कपाळी चंद्रकोर,
साज मराठमोळा लयभारी,
लयभारी दिसते पोर ....
रंगान गोरी-गोरी,
लावते कपाळी चंद्रकोर,
साज मराठमोळा लयभारी,
लयभारी दिसते पोर
नवस मागितला मी,
खंडोबाच्या दारी,
भेटूदे जोडीदार मला,
रुबाबदार भारी...
नवस मागितला मी,
खंडोबाच्या दारी,
भेटूदे जोडीदार मला,
रुबाबदार भारी...
इच्छा माझ्या मनीची सोबत जोडीन,
येइन गड-जेजुरी...
नको पैसा-अडका,
नको ते सोनं-नानं,
सोबत नांदायचय संसारी सुखानं...
गळ्यात काळ मणी, तुमच्या नावाचं हो धनी,
नेसून मी नववारी , शोभेल नाकात नथनी...
होणार राजा तुझी मी बायको लाडाची...
स्वभाव साधा त्याचा, जाणतो माझं मन,
साऱ्या जगात रांगडा लयभारी,
माझा हा नवरदेव
हे रंगानं गोरी-गोरी, लावते कपाळी चंद्रकोर,
साज मराठमोळा लयभारी,
लयभारी दिसते पोर...
रंगानं गोरी-गोरी, लावते कपाळी चंद्रकोर,
साज मराठमोळा लयभारी,
लयभारी दिसते पोर...
§ § § §
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
तर आज आपण Lay Bhari Diste Por Song Lyrics Marathi बघितले. अन्य मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला भेट देत रहा.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏
Post a Comment