घरात चोर शिरला गवळण Lyrics | Gharat Chor Shirala Gavlan Lyrics
नमस्कार, आज या पोस्टमध्ये आपण घरात चोर शिरला गवळण Lyrics बघणार आहोत.
घरात चोर शिरला गवळण Lyrics | Marathi
अहो आत्याबाई हो
अहो घरात चोर शिरला...
आत्याबाई घरात चोर शिरला..
सासुबाई घरात चोर शिरला ... ||धृ||
उठ लवकरी गं..... उठ लवकरी
उठ लवकरी... जीव माझा घाबरला
घरात चोर शिरला...
आत्याबाई घरात चोर शिरला..
सासुबाई घरात चोर शिरला ... || १ ||
काम झाले चटकन, मी बाई पटकन
घरात निजले होते
कुणी कडून आला कृष्ण मुरारी
मी बाई पटकन उठले
भर झोपेत जीव माझा घाबरला
घरात चोर शिरला...
आत्याबाई घरात चोर शिरला..
सासुबाई घरात चोर शिरला ... || २ ||
सासुबाई सांगत नाही मी हो तुम्हाला
खुशाल झोपा घेता बाई भलत्याच वेळेला
दह्या दूधाचा माठ बाई शिंक्यावरला
घरात चोर शिरला...
आत्याबाई घरात चोर शिरला..
सासुबाई घरात चोर शिरला ... || ३ ||
नका येऊ तुम्ही मी जाते ग
संत जनी हात जोडीते
तुझ्या नामाचा महिमा आज कळला
घरात चोर शिरला...
आत्याबाई घरात चोर शिरला..
सासुबाई घरात चोर शिरला ... ||४||
उठ लवकरी गं..... उठ लवकरी
उठ लवकरी... जीव माझा घाबरला
घरात चोर शिरला...
आत्याबाई घरात चोर शिरला..
सासुबाई घरात चोर शिरला ...
☙ ☙ ☙ ☙
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- खोड्या नको करू माझे बाबा गवळण Lyrics
- हरी बांगड्या विकायला आला गवळण
- सांगते देवा तुला याच घडीला गवळण Lyrics
- राधा आलीया गोडीला Lyrics
आज आपण घरात चोर शिरला गवळण Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment