Header Ads

Ekadashi Bhajan Marathi | एकादशी स्पेशल भजने मराठी मधून


नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला Ekadashi Bhajan Marathi वाचायला मिळतील. एकादशीच्या वेळी म्हणायची विठ्ठलाची काही खास भजने आपण इथे बघणार आहोत.


    Ekadashi Bhajan Marathi

    🙏🙏🙏🙏🙏

    भजन - १

    धावूनी ये विठ्ठला सत्वरी
    सुनी सुनी वाटे तुझी पंढरी || धृ ||

    पंढरी सोडून पांडुरंगा गेलासी का दूर
    तू नसताना उदास वाटे तुझे हे पंढरपूर
    पाहिले आम्ही एक नाथा घरी
    सुनी सुनी वाटे तुझी पंढरी || १ ||

    संत सावत्याच्या मळ्यामध्ये तू गेला का पांडुरंगा
    देवा इथं तू नाही म्हणून मी आटली ही चंद्रभागा
    बसला कुठे तू कूण्या मंदिरी
    सुनी सुनी वाटे तुझी पंढरी || २ ||

    सखू जनाबाईची कामे कराया रमलाशी का देवा ?
    चोखोबाची गुरे ओढणी दमलाशी काय देवा
    सोपानाच्या सख्या श्रीहरी
    सुनी सुनी वाटे तुझी पंढरी || ३ ||

    धावूनी ये विठ्ठला सत्वरी
    सुनी सुनी वाटे तुझी पंढरी || धृ ||

    —⸎ — ⸎ — ⸎ —

    भजन - २

    विठ्ठलाला कधी मी पाहीन
    एकादशीला पंढरी जाईन || धृ ||

    चंद्रभागेच्या तिरी पुंडलिक मध्यावरी
    त्याचं दर्शन दुरून घेईन
    एकादशीला पंढरी जाईन || १ ||

    अबीर बुक्क्यानं भरलय ताट
    मी जाते राउळात
    विठ्ठलाला बूक्का मी वाहीन
    एकादशीला पंढरी जाईन || २ ||

    जाते राउळात थेट
    तिथे सखुबाईचा मठ
    ज्यांनी म्हणे देवा अभंग गाईन
    एकादशीला पंढरी जाईन || ३ ||

    विठ्ठलाला कधी मी पाहीन
    एकादशीला पंढरी जाईन || धृ ||

     —  —  —

    भजन - ३

    माझ्या या मनाच्या मंदिरात
    विठुरायाची पांडुरंगाची पहात होते वाट || धृ ||

    मायेचा दोर तोडा ग
    विठूला प्रेमाने जोडा ग
    देव येईल वदनात
    विठुरायाची पांडुरंगाची पहात होते वाट || १ ||

    माया मोह सोडा ग
    भजन कीर्तन करा ग
    देव येईल येईल भजनात
    विठुरायाची पांडुरंगाची पहात होते वाट || २ ||

    अहंकार सारा सोडा ग
    मोक्षाचा मार्ग धरा ग
    देव येईल येईल संसारात
    विठुरायाची पांडुरंगाची पहात होते वाट || ३ ||

    नामदेव बसले पायरीवरी
    सखू उभी राहिली महाद्वारी
    देव वसले वसले हृदयात
    विठुरायाची पांडुरंगाची पहात होते वाट || ४ ||

    एका जनार्दनी ध्यानी मनी
    चक्रपाणी आले भूवरी
    बोला विठ्ठल विठ्ठल गजरात
    विठुरायाची पांडुरंगाची पहात होते वाट || ५ ||

    माझ्या या मनाच्या मंदिरात
    विठुरायाची पांडुरंगाची पहात होते वाट || धृ ||

     —  —  —

    भजन - ४

    उसळली चंद्रभागा पाणी हे अथांग
    आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग || धृ ||

    घरोघरी सुवासिनी टाकितात सडा
    चंद्रभागेच्या पाण्याने भरलाय घडा
    कुंकवाने माझा भरलाय भांग ..
    आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग || १ ||

    राउळात आता गलबत सारे गोळा झाले
    पांडुरंग भेटीसाठी पहा भक्त आले
    पाऊलांच्या खेळावर टाळ नी मृदुंग
    आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग || २ ||

    कळसाचं सोनं राऊळाची शोभा
    कटेवरी हात विटेवरी उभा

    विठुराया उभा आहे रखुमाई दंग
    आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग || ३ ||

    उसळली चंद्रभागा पाणी हे अथांग 
    आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग || धृ ||

     —  —  —


    भजन - ५

    विठ्ठल विठ्ठल जप करिते मनात
    करिते मनात उभी तुळशीच्या बनात || धृ ||

    तुळशी ग बाई तुझं खोड काय केलं ?
    विठ्ठलाच्या पालखीला घडविण्यास दिल || १ ||

    तुळशी ग बाई तुझ्या फांद्या काय केल्या ?
    वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशी माळा केल्या || २||

    तुळशी ग बाई तुझ्या मंजुळा काय केल्या ?
    विठ्ठलाच्या गळ्यातल्या हारामध्ये गुंफल्या || ३ ||

    तुळशी ग बाई तुझा रुंद रुंद पाला
    तुझ्या सावलीत राम राया झोपी गेला  || ४ ||

    विठ्ठल विठ्ठल जप करिते मनात
    करिते मनात उभी तुळशीच्या बनात || धृ ||

                                                                  — —  —  —

    भजन - ६

    चालता.... घ्यावे हरीचे नाम
    विठू भक्ताचे करितो गं कल्याण || धृ ||

    संत तुकारामा घरी,
    गाथा वाचू लागे हरी
    कीर्तने नाचतो घनश्याम
    विठू भक्ताचे करितो गं कल्याण || १ ||

    संत जनाबाईच्या घरी,
    दळण दळू लागे हरी
    ओव्या गं गातोय घनश्याम
    विठू भक्ताचे करितो गं कल्याण || २ ||

    संत सावता च्या घरी,
    भाजी काढू लागे हरी
    जुड्या ग बांधितो घनश्याम
    विठू भक्ताचे करितो गं कल्याण || ३ ||

    संत कबीराच्या घरी,
    शेला विनू लागे हरी
    नक्षी ग काढतो घनश्याम
    विठू भक्ताचे करितो गं कल्याण || ४ ||

    चालता.... घ्यावे हरीचे नाम
    विठू भक्ताचे करितो गं कल्याण || धृ |

               — —  —  —

    भजन - ७

    टाळ वाजतो मृदुंग वाजतो
    देव संतांच्या मेळ्यात नाचतो || धृ ||

    भाजी खुडीता देव दमले
    जुड्या बांधत हात शिनले
    टाळ वाजतो मृदुंग वाजतो ... || १ ||

    दळण दळीता देव दमले
    पीठ भरता बोट शिणले
    टाळ वाजतो मृदुंग वाजतो .... || २ ||

    शेले विनिता देव दमले
    रंग भरता हात शिणले
    टाळ वाजतो मृदुंग वाजतो .... || ३ ||

    चिखल तुडविता देव दमले
    मडके घडविता हात शिनले
    टाळ वाजतो मृदुंग वाजतो ..... || ४ ||

    टाळ वाजतो मृदुंग वाजतो
    देव संतांच्या मेळ्यात नाचतो || धृ ||

    —⸎ — ⸎ — ⸎ —

    भजन - ८

    आज आहे एकादशी ध्यानामध्ये घ्या
    देवा तुम्ही फराळाला लवकर या
    वारकरी विठू भक्त निष्ठले पहा
    रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || धृ ||

    चंदनाचे पाट, चांदीचे ताट
    समया चार, फराळाचा थाट
    उदबत्तीचा सुवास देवा तुम्ही घ्या
    रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || १ ||

    नाना केले पकवान मी पुढे मांडते
    भगरीच्या खिचडी वर आमटी देते
    बटाट्याच्या भाजीचा स्वाद तुम्ही घ्या
    रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || २ ||

    उपवासाच्या चकल्या, शिंगाड्याची बोंडे
    फराळाचा चिवडा, खीर - बर्फी - पेढे
    राजगिऱ्याचा गरम शिरा सावकाश घ्या
    रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || ३ ||

    ताजे दूध आणून या बासुंदी केली
    चांदीच्या या वाटीमध्ये तुम्हा अर्पिली
    श्रीखंडाची वडी तुम्ही उचलून घ्या
    रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || ४ ||

    फराळ झाल्यावर हा सुवर्ण पेला
    गंगाजल देते देवा तुम्हा पिण्याला
    लवंग वेलदोड्याची मुखशुद्धी तुम्ही घ्या
    रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || ५ ||

    हात जोडून या एक करते विनंती
    शरण आली दासी प्रभू तुमच्या चरणाशी
    आशीर्वाद देऊनीया निरोप आता घ्या
    रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || ६ ||

    आज आहे एकादशी ध्यानामध्ये घ्या
    देवा तुम्ही फराळाला लवकर या

    वारकरी विठू भक्त निष्ठले पह
    रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || धृ ||

     —  —  —

    भजन - ९

    टाळ वाजतो वाजतो खनखन
    या माऊलीच्या दिंडीला कोण कोण || धृ ||

    सासू-सासरा एकात
    मृदुंग घेतला हातात
    टाळ वाजतो वाजतो खनखन .... ||१ ||

    जाऊ भासरा एकात
    विना घेतला हातात
    टाळ वाजतो वाजतो खनखन .... ||२ ||

    वीर ननंद एकात
    टाळ घेतला हातात
    टाळ वाजतो वाजतो खनखन .... ||३ ||

    टाळ वाजतो वाजतो खनखन
    या माऊलीच्या दिंडीला कोण कोण || धृ ||

     —  —  —


    हे पण नक्की वाचा 👇👇👇



    तर आज या पोस्टमध्ये आपण, Ekadashi Bhajan Marathi मधून बघितले.

    पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.