Header Ads

Mangal Desha Pavitra Desha Lyrics - मंगल देशा, पवित्र देशा लिरिक्स


नमस्कार मित्रांनो ,या पोस्ट मध्ये तुम्हाला Mangal Desha Pavitra Desha Lyrics या गण्याचे बोल वाचायला मिळतील.


Mangal Desha Pavitra Desha Lyrics | Marathi


मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा

भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा

ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,

वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥




अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा

पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा

तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची

ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥



हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर मित्रांनो आज आपण Mangal Desha Pavitra Desha Lyrics बघितले मराठी गण्यांच्या लिरिल्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया.

धन्यवाद !!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.