बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे | Budhham Saranam Mhanaa Re Lyrics | Bheemgeet
नमस्कार मित्रांनो ,या पोस्ट मध्ये तुम्हाला बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे लिरिक्स वाचायला मिळतील. चला तर मग बघूया याचे बोल -
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे
पंचशीला त्रिशरण हि तत्त्वे दिधली या बहुजना
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
पंचशीलाची पंचतत्त्वे हि मार्ग दाविती भला
सत्य अहिंसा आणि शांतीच्या छायेत राहू चला
खोटे बोलणे चोरी करणे छंद नसे चांगला
सकलासाठी तथागताने हा उपदेश दिला
कुणीही यावे पावन व्हावे निर्मळ करुनी मना
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा
भेदभावाची चिता पेटवून समतेने नांदूया
हितकारक ही तत्त्वे सारी आचरणी आणूया
त्यजूनी वाईट व्यसने आपण सौख्याला साधूया
आदर्शाचे जीवन अपुले जगताला दावूया
उच्च असो की नीच असो हा दोष न द्यावा कुणा
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा
समानता अन मानवताही श्रद्धेने आचरा
दुःखी जीवांचे दुःख हरावे मर्म हे ध्यानी धरा
नीती शील अन प्रज्ञा करुणा नेमाने अनुसरा
बुद्धाची ही शिकवण तुम्हा पालन याचे करा
माणूस म्हणुनी जगण्यासाठी हीच दिली प्रेरणा
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा
मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे लिरिक्स बघितले. मराठी गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.
धन्यवाद !!!!!
You May Also Like 👇👇👇
Post a Comment