कृष्ण मुरारी गवळण Song Lyrics | Gayatri Shelar | Goutami Patil
नमस्कार,स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!!!! आज या पोस्ट मध्ये कृष्ण मुरारी गवळण Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - कृष्ण मुरारी
लिरिक्स - विशाल शेलार
सिंगर - गायत्री शेलार
म्युझिक - आदित्य पाटेकर, करण वावरे
कृष्ण मुरारी गवळण Song Lyrics | Marathi
धरुनी ग हात माझा पदर ओढतो |
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो || धृ ||
बाजारी जाता घोर वाटे जीवाला |
कुठून अचानक येतो आडवा वाटेला ||
दही दूध चोरून माझा घडा फोडितो |
तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढितो || १ ||
जमवून गोपी राधा संगे गवळणी ना |
गोकुळात साऱ्या कान्हा घालीतो धिंगाणा ||
गोठ्यातल्या गाई म्हशी तो गं सोडीतो|
तुझा कृष्ण सावळा ग माझी छेड काढीतो || २ ||
यशोदा म्हणे आता बांधूनी उखळाला |
समजावून सांगते मी माझ्या बाळाला ||
विनवणी त्याला आज हात जोडीतो |
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो || ३ ||
* * * * *
हे भक्तीगीत पण नक्की वाचा 👇👇👇👇
तर आज या पोस्ट मध्ये आपण कृष्ण मुरारी गवळण Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पुर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment