Header Ads

Kuthla Rasta Marathi Song Lyrics | कुठला रस्ता | योगिता गोडबोले पाठक



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Kuthla Rasta Marathi Song Lyrics बघणार आहोत. ऑक्सीजन या मराठी चित्रपटातील हे गाणं आहे. योगिता गोडबोले पाठक यांनी हे गाणं गायलेलं आहे.


सॉंग - कुठला रस्ता
मुव्ही - ऑक्सीजन ( २००९)
सिंगर - योगिता गोडबोले पाठक
म्युझिक - अजय -अतूल


Kuthla Rasta Marathi Song Lyrics | Marathi

कुठला रस्ता कुठली वळण,
कसला हा अंधार
कसल्या भिंती, कसलं घरटं
कसला हा संसार...

कापरा वारा बेभान,
सारखा घाली थैमान रं
जगण्याच्या या वाटांवरती
देवाचे बी वारं, झालं बंद आता देवा
कसला रं आधार...

चालून थकलं पाऊल आता
थांबत मनात समद काही
उन्ह उन्ह झालं झाड पाखरांचं
सावली कुठच आज न्हाई...
वनव्याच्या ज्वालांनी घेरल्या दिशा...
ठिणग्यांनी सावल्या पेटल्या जशा
जगण्या मरणाचा अवतार..

कुठला रस्ता कुठली वळण,
कसला हा अंधार
कसल्या भिंती, कसलं घरटं
कसला हा संसार...

कापरा वारा बेभान,
सारखा घाली थैमान रं
जगण्याच्या या वाटांवरती
देवाचे बी वारं, झालं बंद आता देवा
कसला रं आधार...

जल्माची साऱ्या सांग कहानी
तळहाती तुटलेलं रेषा
फिरत्यात सारं नशिबाचा फेर
जगण्याची वनवनती भाषा
कळला ना पिरतीचा अर्थ का कुणा
हसण्यावर नसण्याचा सूड का पुन्हा
जगण्या मरण्याचा अवतार

कुठला रस्ता कुठली वळण,
कसला हा अंधार
कसल्या भिंती, कसलं घरटं
कसला हा संसार...

कापरा वारा बेभान,
सारखा घाली थैमान रं
जगण्याच्या या वाटांवरती
देवाचे बी वारं, झालं बंद आता देवा
कसला रं आधार...

✜ ✜ ✜ ✜



हे पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण Kuthla Rasta Marathi Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.