Header Ads

उच नीच काही नेणे भगवंत Lyrics | Uch Nich Kahi Nene Bhagavant


नमस्कार या पोस्टमध्ये आपण उच नीच काही नेणे भगवंत Lyrics बघणार आहोत. संत तुकाराम महाराजांचा ह अभंग आहे.

उच नीच काही नेणे भगवंत Lyrics | Marathi

उंच नीच काही नेणे भगवंत |
तिष्ठे भाव भक्त देखोनिया  || धृ ||

दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी |
ज्याच्या घरी रक्षी प्रल्हादासी  || १ ||

चर्म रंगू लागे रोहिदासा संगे |
कबीराचे मागे शेले विनी    || २ ||

सजन कसा या विकू लागे मांस |
माळ्या सावत्यास खूरपू लागे || ३ ||

नरहरी सोनारा घडू फुकू लागे |
चोखामेळा संगे ढोरे ओढी   || ४ ||

नाम्याची जणी सवेरेची सेणी |
धर्माधिकारी पाणी वाहे झाडी ||५ ||

नाम्या सवे देवी नव्हे संकोचित |
ज्ञानियाची भिंत अंगे ओढी  ||६ ||

अर्जुनाचे रथी होय हा सारथी |
बक्षी पोहे प्राती सुदाम्याचे   ||७ ||

गवळी यांचे घरी अंगे गाई वळी |
द्वारपाळ बळी द्वारी झाला   || ८ ||

एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी |
अंबऋषी चे सोशी गर्भवास   ||९ ||

मिराबाई साठी घेतो विष प्याला |
दामाजीचा झाला पाडीवार   || १० ||

घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची |
हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी   || ११ ||

पुंडलिकासाठी अझू नि तीष्ठत |
तुका म्हणे मात धन्य त्याची    ||१२ ||

* * * * *



हे पण नक्की वाचा 👇👇👇👇



तर आज आपण या पोस्टमध्ये उच नीच काही नेणे भगवंत Lyrics बघितले. अधिक मराठी गाण्यांचे लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.