Tulasi Aarti Lyrics (Marathi) | तुळशी मातेची आरती
नमस्कार मित्रानो, तुळशी या रोपाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. देवाच्या नैवेद्यामध्ये पण तुळशीच्या पणाला विशेष स्थान आहे. पण तुम्हाला तुळशीची कथा माहित आहे काय ? आज आपण तुळशीमातेची कथा आणि Tulasi Aarti Lyrics मराठी मधून बघणार आहोत. बहुतेक वेळा तुळशीच्या लग्नाच्या वेळी हि आरती बोलली जाते.
* तुळशी माता कोण आहे ?? 🌿🌿
एकदा देवता आणि राक्षसमध्ये युद्ध सुरु झाले. जेव्हा जलंधर युद्धासाठी जात होता तेव्हा वृंदा त्याला बोलली स्वामी तुम्ही येत नाही तोपर्यंत मी पूजेमध्ये बसून तुच्या विजयासाठी अनुष्ठान करेल. आणि जोपर्यंत तुम्ही पारत येत नाही माझा संकल्प सोडणार नाही.
तिकडे वृंदाच्या व्रताच्या प्रभावाने देवता जलंधर ला हरवू शकले नाहीत. सर्व देवता जेव्हा हरायला लागले तेव्हा विष्णू देवाकडे कडे पोहोचले. आणि त्यांना मदत करण्याची प्रार्थना केली . त्यावर भगवान बोलले वृंदा माझी परम भक्त आहे मी काही नाही करू शकत. तेव्हा सर्व देवतांच्या विनंतीवरून विष्णूदेवांनी दुसरा उपाय केला. स्वतः विष्णू जलंदरच रूप घेऊन महालामध्ये गेले. जसे वृंदाने त्यांना बघितले तिचे व्रत तुटले आणि तिकडे देवतांनी जलंधर चे डोके धडापासून वेगळे केले आणि ते येऊन महालात पडले आपल्या पतीचे तुटलेले डोके बघून वृंदाला आश्चर्य वाटले . तिने विष्णू भगवान यांच्या कडे बघितलं तर ते त्यांच्या मूळ रूपात आले.
वृंदाला खूप दुःख झाले. तिने विष्णू देवाला श्राप दिला आणि ते शाळीग्राम दगड बनले. नंतर सर्व देवांच्या विनंतीमुळे वृंदाने आपला श्राप परत घेतला आणि भगवान विष्णू परत आपल्या मूळ रूपात आले. पण वृंदा पतीच्या तुटलेल्या डोक्यासोबत सती होऊन गेली तिच्या राखेमधून एक रोपटं उगवलं. त्या रोपाला विष्णू देवानी तुळशी असे नाव दिले आणि वृंदाच्या पवित्रतेवर खुश होऊन तिला वर दिला कि आजपासून तुळशीची पूजा होईल आणि या घटनेची आठवण म्हणून शाळिग्रामची पण पूजा होईल. आणि विष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाईल.
* तुळशीमातेची कोणती काळजी घ्यावी ??👀
- तुळशीच्या रोपाचे वेळोवेळी मंजुरे तोडून टाकावे. नाही तर तुळशी बिमार होऊन सुकुन जाईल.
- तुळशीला एकादशी आणि रविवार सोडून बाकी दिवस रोज पुरेश्या प्रमाणात पाणी द्यावे.
- ज्या मुलींचे स्त्रियांचे पिरियड्स सुरु असतील त्यांनी तुळशीपासून दूर राहावे. नाही तर ते सुकते.
- ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे , हिवाळ्यामध्ये तुळशीच्या रोपावर कपडा टाका. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी तुळशी जवळ दिवाही लावू शकता यामुळे उब राहील आणि थंडीपासून तुळशीचे रक्षण होईल.
* तुळशीमातेची रोजची पूजा कशी करावी ??🙏
- सर्व प्रथम कलशमध्ये पाणी घेऊन तुळशी मातेला अर्पण करावे .
- नंतर हळद, कुंकू फुले वाहून दिवा बत्ती लावावी आणि नमस्कार करावा.
- हि पूजा करताना तुम्ही मंत्रजप पण जरूर केला पाहिजे. तुळशीमातेचा मंत्र खालीलप्रमाणे आहे -
" तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत् । "
- पूजेनंतर पण तुम्ही ११, २१ किंवा ५१ वेळा या मंत्राचा जप करू शकता.
Tulasi Aarti Lyrics | Marathi
जय देवी जय देवी जय माये तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी ॥ ध्रु ॥
ब्रह्मा केवळ मूळी मध्यें तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ।
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥
जय देवी जय ॥ १ ॥
शीतल छाया भूतलव्यापक तू कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तूझ शुभ कार्तिकमासी ॥
जय देवी जय ॥ २ ॥
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी।
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥
जय देवी जय ॥ ३ ॥
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Post a Comment