होळी सणाबद्दल माहिती मराठीतून | होळी का साजरी केली जाते ?
होळी हा सण वाईटा वर चांगल्या चा विजय म्हणून साजरा केला जातो. त्यासोबतच राधा कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ही रंग खेळण्याचे वर्णन ग्रंथांमध्ये आढळून येते. या सणाला होलिका दहन, शिमगा, फागुन, दोल यात्रा यासारख्या विविध नावाने ओळखले जाते. हा सण पाच दिवस चालतो.
होळी हा सण का साजरा करतात ?
होळीच्या संदर्भात काही कथा प्रसिद्ध आहेत त्यातील एक कथा म्हणजे हिरण्यकशिपू राक्षस आपला मुलगा प्रल्हाद याला विष्णू भक्ती करण्यास विरोध करत असतो. पण प्रल्हाद ते मान्य करत नाही म्हणून त्याला मारण्यासाठी खूप उपाय करतो तरीही विष्णूच्या आशीर्वादाने प्रल्हादाचे रक्षण होते म्हणून शेवटी तो आपली बहीण होलिका ची मदत घेतो. होलीकेला आगीत न जळण्याचे वरदान मिळाले असते, पण प्रल्हादला घेऊन जेव्हा होलीका आगीमध्ये बसते, तेव्हा विष्णूच्या कृपेने प्रल्हादला काहीच होत नाही आणि होलिका जळून भस्म होते. तेव्हापासून या दिवशी होळी जाळली जाते.या संदर्भात राधा कृष्णाच्या अतुल तेव्हाचे वर्णन करणारे संदर्भ दिसून येतात गर्ग संहिता नावाच्या ग्रंथात राधाकृष्णाने रंग उधळून होळी साजरा केल्याचे वर्णन आहे.
होळी या सणाचे वैज्ञानिक कारणही आहे हा काळ म्हणजे हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचा काळ असतो. थंडीमुळे आपल्या शरीराला आलेली सुस्ती होळीच्या उष्णतेमुळे निघून जाते ऋतूमध्ये होणारा हा बदल मानवाला समजावा आणि त्याने तो स्वीकारावा. म्हणून होळी साजरी केली जाते.
भारतात होळी कशी साजरी करतात ?
लाकडाचे तुकडे, गौर्या सुकलेले गवत जाळून त्याची होळी पेटवतात. बायको महिला या होळीचे विधिवत पूजा करतात. विशेष करून पुरणपोळीचा नैवेद्य यावेळी होळीला दाखवला जातो. पूजा झाल्यानंतर होळी पेटवली जाते.
कोकणात होळीचा सण विशेष उत्साहाने साजरा करतात. कारण या महिन्यात शेतकऱ्यांची शेतीची कामे संपलेली असतात. त्यामुळे या काळात शिमगा उत्सव साजरा केला जातो. साधारणतः पंधरा दिवस हा उत्सव चालतो. या काळात पंचमीला छोटी होळी पेटवतात. आणि पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरवल्या जातात.
भारताच्या अन्य भागातही हा सण उत्साहाने साजरा केला जातो. बंगालमध्ये याला बसंत उत्सव म्हणतात. यावेळी त्या ठकाणी मिरवणूकही काढली जाते. उत्तर प्रदेशात याला लठमार होली असे म्हणतात. या ठिकाणी होळी राधा कृष्णाच्या प्रेमाची प्रतिक म्हणून साजरा केली जाते. ज्यामध्ये महिला पुरुषांना काठीने मारतात आणि पुरुष स्वतःचा बचाव करतात. दक्षिण भारतात या सणाला कामदहनम म्हणतात. शिवाने आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवतेचा नाश केला अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.
Post a Comment