Header Ads

Prahlad Shinde Aata Tari Deva Mala Pavshil Ka Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Prahlad Shinde Aata Tari Deva Mala Pavshil Ka Lyrics बघणार आहोत.

Prahlad Shinde Aata Tari Deva Mala Pavshil Ka Lyrics

आता तरी देवा मला पावशील का ?
सुख ज्याला म्हणतात ते दावशील का ?
ओ ओ ओ...

आता तरी देवा मला पावशील का ?
सुख ज्याला म्हणतात ते दावशील का ?

पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ
पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ
न्यायासाठी मदतीला धावशील का ?
सुख ज्याला म्हणतात ते दावशील का ?

चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो
चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो
लाच घेशील त्यांना आळा घालशील का ?
सुख ज्याला म्हणतात ते दावशील का ?

दिले निवडून जरी आमूचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी
दिले निवडून जरी आमूचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी
भलं आमचं करण्याला सांगशील का ?
सुख ज्याला म्हणतात ते दावशील का ?

⚛ ⚛ ⚛ ⚛



हे पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण Prahlad Shinde Aata Tari Deva Mala Pavshil Ka Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.